राज्यात वीजदरवाढीची अंमलबजावणी

| मुंबई | प्रतिनिधी |
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी ( 1 एप्रिल) वीज दर महाग झाले आहेत. याचा परिणाम प्रत्येक घरावर होणार आहे. आता दर महिन्याला त्यांना वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. वीज वितरणच्या प्रामुख्याने चार कंपन्या आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे. याशिवाय टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी खाजगी क्षेत्रातही वीज वितरण करतात. याशिवाय मुंबईत बेस्टकडून प्रामुख्याने वीजपुरवठा केला जातो. वीज दरात 5 ते 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक घराचे वीज बिल किमान 5-10 टक्क्यांनी वाढेल.

महावितरणचे नवीन दर :
महावितरणने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.9 टक्के आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 5.6 टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे आर्थिक वर्ष 2025 पर्यंत निवासी विजेच्या दरात 6 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये औद्योगिक वीज दर 1 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4 टक्के वाढले आहेत.

टाटा पॉवरचा नवा दर :
टाटा पॉवरच्या वीज दरांबद्दल बोलायचे झाल्यास, ऋध2024 साठी दर 11.9 टक्के आणि ऋध2025 साठी 12.2 टक्के वाढवले आहेत. या दरवाढीमुळे, निवासी विजेच्या वीज दरात आर्थिक वर्ष 2024 मध्ये 10 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 21 टक्के वाढ झाली आहे. उद्योगासाठी, आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 17 टक्क्यांनी दर वाढले आहेत.

Exit mobile version