। मुंबई । प्रतिनिधी ।
कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्याने दावा केला होता की त्याचा फोन हॅक झाला होता. याबाबतचे कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरिक्षण खटल्याच्या नोंदीतून काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
प्रशांत कोरटकरला आज मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय घ्यावा असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला होता. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला अनेक जळजळीत प्रश्न विचारले, कोंडीत पकडले. त्यामुळे राज्य सरकारनेही प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द व्हावा यासाठी हाय कोर्टात अपील केले.
‘प्रशांत कोरटकर या तथाकथित पत्रकाराने भ्रष्ट मार्गाने बऱ्याच गोष्टी केल्याच समोर आले आहे. त्याने इंद्रजीत सावंत यांच्याबद्दल जे वक्तव्य केल, त्याची भाषा क्रूरतेची होती. जातीय तेढ निर्माण करणारी भाषा होती’, असे प्रसिद्ध वकिल असिम सरोदे म्हणाले.