महत्वाची बातमी! चौल बायपासला झाड कोसळले

अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी रात्रीपासून सुुरू असलेल्या पावसामुळे चौल बायपास येथील भले मोठे झाड रस्त्यातच कोसळले.

त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली असून झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम स्थानिकांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Exit mobile version