| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल या केंद्र सरकारी कंपनीत गुरूवारपासून (दि.७) काही कालावधीत कारगोची वाहतूक करण्यात येणार आहे. टोटल मुव्हमेंन्ट प्रा. कंपनीकडून ही वाहतूक करण्यात येणार आहे. कारगोची रुंदी ६.५३ मी. व उंची १० मी. आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता अलिबाग- रोहा मार्गावरील वाहतूक तसेच लाईट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
कुरूळ येथील कोकण बार्ज ते उसर दरम्यान तीन टप्प्यात ही वाहतूक करण्यात येणार आहे. याबाबत टोटल मुव्हमेंन्ट प्रा. कंपनीकडून वन विभाग तसेच महावितरण विभागाची परवानगी घेण्यात आली आहे.