। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे दिशेकडे असलेल्या मालवाहू गाड्यांच्या यार्डमधील ओव्हरहेड वायरची सुधारणा करण्यासाठी 12 एप्रिल आणि 14 एप्रिल असे दोन दिवस दुपारच्या वेळी ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे दुपारच्यावेळी कर्जत-खोपोली दरम्यान चालविणार्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.
कर्जत रेल्वे स्थानकातील यार्ड सुधारण्यासाठी 12 आणि 14 एप्रिल रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यातील पहिल्या ब्लॉकमध्ये 12 एप्रिल रोजी कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावर ओव्हर हेड वायर संरचना उभारण्याचे काम केले गेले. त्याचवेळी लोड हस्तांतरणासाठी घाट विभाग ते कर्जतपर्यंत सुधारणा करण्याचे काम मध्य रेल्वे प्रशासनाने दुपारच्या ब्लॉक दरम्यान पूर्ण केले. त्या कामांसाठी आज सकाळी दहा वाजून 50 मिनिटे ते दुपारी एक वाजून 50 मिनिटे पर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला.
या कालावधीत कर्जत स्थानकातून खोपोलीकरीता दुपारी एक वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात येणारी उपनगरीय गाडी रद्द करण्यात आली होती. त्याचवेळी खोपोली येथून कर्जत करीता दुपारी दोन वाजून 55 मिनिटांनी सोडण्यात येणारी लोकल रद्द करण्यात आली होती.
तसेच 14 एप्रिल रोजी देखील कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावर ओव्हर हेड वायर संरचना उभारण्यासाठी आणि लोड हस्तांतरणासाठी घाट विभाग ते कर्जतपर्यंत दुपारी एक वाहून 45 मिनिटे ते दुपारी तीन वाजून 45 मिनिटांपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जतहून एक वाजून 15 मिनिटांनी सुटणारी खोपोली लोकल आणि दोन वाजून 55 मिनिटे वाजता खोपोलीहून सुटणारी कर्जत लोकल रद्द असणार आहे.