धक्कादायक! डब्ल्यूएचओ म्हणतंय कोरोना नष्ट होणे अशक्य…

2009चा विषाणू अजूनही जिवंत
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
करोना गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व देशांमध्ये कहर माजवत आहे. भारतही यापासून सुटला नाही.जरी आतापर्यंत करोनाच्या प्रकरणांमध्ये किंचित घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य तज्ञ वेळोवेळी याबद्दल नवीन माहिती शेअर करत राहतात. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ताजी माहिती निराशाजनक आहे. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की. करोनाला सध्या महामारीच्या श्रेणीत ठेवले जाईल कारण करोना नाहीसा होणार नाही.
 डब्ल्यूएचओच्या निवेदनामुळे हे स्पष्ट झाले आहे की सध्या जगाला निर्बंधांच्या छायेखाली राहणे आवश्यक आहे कारण कोरोना संसर्ग आणि त्याचे नवीन प्रकार जोखीम वाढवत आहेत. डब्ल्यूएचओ हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डॉक्टर माईक रायन यांनी म्हटले आहे की, 2009 च्या स्वाइन फ्लू साथीचा विषाणू अजूनही फिरत आहे. कोरोनाव्हायरस नाहीसा होणार नाही.
 डब्ल्यूएचओने म्हटले आहे की जेव्हा जगभरातील अधिकाधिक लोकांना लस मिळेल आणि प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर विकसित होईल, तेव्हा कोरोनामुळे होणार्‍या मृतांची संख्या आपोआप कमी होईल. यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची पातळी कमी होईल. डॉक्टर माईक रायन म्हणाले, कोविड ही आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.
   2012 मध्ये प्रकाशित झालेल्या वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय गटाच्या अभ्यासानुसार 2009 च्या स्वाईन फ्लूच्या साथीने अंदाजे 2,84,500 लोकांचा बळी घेतला होता. क1छ1 ने नोव्हेंबर 2009 पर्यंत कमी होण्यास सुरवात केली होती आणि डब्ल्यूएचओने पुढील ऑगस्टच्या शेवटी त्याला साथीचा रोग घोषित केले होते.

Exit mobile version