| नवी दिल्ली |वृत्तसंस्था |
जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिनचा पुरवठा संयुक्त राष्ट्र संस्थांच्या वतीने स्थगित करण्यात आला आहे. निरीक्षणात आढळलेल्या उणीवा दूर करणे आणि सुविधा अपग्रेड करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे.
डब्ल्यूएचओनुसार लस मिळालेल्या देशांना योग्य कारवाई करण्यास सांगितले गेले आहे. मात्र योग्य कारवाई काय असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की लस प्रभावी आहे आणि सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नाही. मात्र निर्यातीसाठी उत्पादन स्थगित केल्यामुळे कोव्हॅक्सिनचा पुरवठा बाधित होईल. हे निलंबन 14 ते 22 मार्चपर्यंत डब्ल्यूएचओ पोस्ट इमर्जन्सी यूज लिस्टिंग (ईयूएल) निरीक्षणाच्या परिणामांच्या प्रत्युत्तर दाखल आहे. लस निर्माता भारत बायोटेकने निर्यातीसाठी कोव्हॅक्सिनचे उत्पादन स्थगित करण्याचे संकेत दिले आहे. या पूर्वीच औषध निर्माता कंपनी भारत बायोटेकने म्हटले होते, की कंपनी आपल्या सर्व उत्पादन युनिटमध्ये कोविड 19 चे लस कोव्हॅक्सिनचे उत्पादन काही काळासाठी कमी करित आहे. खरेदी एजन्सींचे लस पुरवठ्याची जबाबदारी पूर्ण झाले आहे. त्यामुळे मागणी कमी राहिल. यामुळे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.