लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटरही काढले

। मुंबई । प्रतिनिधी ।
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी सोशल मीडियावर सतत प्रार्थना केली जात होती. दरम्यान त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत पहिल्यापेक्षा सुधारणा झाल्याचं समोर आले असून आता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दींदीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचे व्हेटिंलेटर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अजूनही आयसीयुमध्येच ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version