स्टेडियमवर इम्रान खानचे टी शर्ट

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्‍वचषकात पाकिस्तान संघाची अवस्था खूप बिकट आहे. त्यांच्यावर ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवू शकते. असे असेल तरी पाकिस्तानला पाठींबा देण्यासठी युएसएच्या स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी होत आहे. याचवेळी काही पाकिस्तानी चाहत्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनात काही पोस्टरबाजी केली. इम्रान खान यांचे समर्थन करणारे टी शर्ट घालूनदेखील चाहते आले होते. त्यानंतर नासाऊ स्टेडियममधील आयसीसी सुरक्षा अधिकार्‍यांनी या चाहत्यांना इम्रान खानच्या समर्थनात घातलेले टी-शर्ट काढायला लावले. इम्रान खान हे गेल्या वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

Exit mobile version