कोरोनाकाळात महाराष्ट्राने परप्रांतियाना पिटाळले

मोदींचा संसदेत घणाघात, काँग्रेसवर टीकास्त्र
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोनाची साथ जोरात सुरु असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील परप्रांतियांना पिटाळून लावले त्यामुळे देशभरात कोरोनाचा फैलाव वाढला,असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(7 फेब्रुवारी) लोकसभेत केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर याना आदरांजली वाहिली.ते पुढे म्हणाले की, कोरोना संकटात जो जिथे आहे, त्याने तिथेच राहावं, अशा सूचना दिल्या गेल्या. पण महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडी सरकारने स्थलांतरीत मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटं दिली आणि राज्यातून पिटाळून लावलं. त्याचवेळी दिल्ली सरकारने स्थलांतरीत मजुरांना राजधानी सोडण्यास सांगितलं. बस उपलब्ध करून दिल्या. यामुळे पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला असा आरोप मोदींनी केला.

अनेक निवडणुकांमध्ये पराभव होऊनही काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही. काँग्रेसने पुढील 100 वर्षे सत्तेत न येण्याची मानसिकता तयार केली आहे. तशीच मानसिकता मी ही त्या दृष्टीने तयारी केली आहे,अशी टीका टिपणीही  मोदी यांनी केली.

तुम्ही मला विरोध करा, पण काँग्रेस फिट इंडिया मोहिमेला आणि इतर योजनांना का विरोध करताय? आणखी 100 वर्षे सत्तेत यायचेच नाही, याची मानसिकता तुम्ही तयार केली आहे. –  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देशाला कमी लेखू नका
कोरोनामुळे जागतिक परिस्थिती बदलली आहे. यामुळे भारताने स्वतःला कमी न लेखता आणि नेतृत्व म्हणून पुढे गेले पाहिजे. भारताने ठामपणे आपली भूमिका मांडली पाहिजे,   आमच्या सरकारवर टीका करणार्‍यांनी आधी इतिहास बघावा. तुम्ही 50 वर्षे सत्तेत होता. यामुळे आरोप आणि टीका करण्यापूर्वी विचार करा, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला

Exit mobile version