| पनवेल | प्रतिनिधी |
डॉक्टर वेलफेयर असोसिएशन पनवेलद्वारे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिरीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बैलकर यांच्या शिवसाई दिइसइच आयसीयू मॅटरनिटी आणि मल्टीस्पेसीलिटी हॉस्पिटल करंजाडेमध्ये रविवार ( दि.9) डॉक्टरांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. या वेळी एकूण 55 रक्ताच्या बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
करंजाडेत डॉक्टर वेलफेयर असोसिएशन पनवेलचे अध्यक्ष डॉ. शिरीष जोशी, डॉ. प्रसन्ना जैन, डॉ. सचिन पवार, डॉ .अरूणेश शिंदे, डॉ. अमृतकर, डॉ.अभिजीत भोईर , डॉ. प्रदीप विघ्ने, डॉ. कंकण, डॉ. यासिन शेख यांच्या पुढाकाराने अनेक डॉक्टरांनी रक्तदान केले.
या शिबिराला डॉ. गुणे, डॉ. अरुणकूमार भगत, डॉ. शेलार, डॉ. जगे, डॉ. आवटे, डॉ. अव्सारमल, डॉ. गंडाळ, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. ननावरे, डॉ. इंदर, डॉ. गणेश कुंभार, डॉ. प्रशांत जाधव, संदीप देशमुख, सुरेश जाधव, रामेश्वर पाटील, माधव चप्पलवार, सुजित झांबरे, विक्रम मोरे, अनिरुद्ध कावीकर, शिवानंद बिरादार, वैजनाथ साखरे उपस्थित होते.