कर्जतमध्ये सूर निरागस हो चे स्वर….

दिवाळी संध्याची सुरेल मैफल, श्रोते मंत्रमुग्ध

| कर्जत | प्रतिनिधी |

बाळासाहेबांची शिवसेना कर्जत शहराच्या वतीने आयोजित केलेल्या स्वर बरसात प्रस्तुत दिवाळी संध्या संगीत मैफलीमध्ये गायकांनी सादर केलेल्या जुन्या – नव्या गीतांमुळे कर्जतकर मंत्रमुग्ध झाले. यावेळी साथ संगत देणार्‍या कलाकारांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

श्री कपालेश्‍वर मंदिराच्या सभागृहात दिवाळी संध्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गजाननबुवा पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक करोडे यांच्या हस्ते श्री कपालेश्‍वराला श्रीफळ अर्पण करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक संकेत भासे, बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, माजी सरपंच हर्षद विचारे, प्रसाद पाटील, पुंडलिक भोईर आदी उपस्थित होते. दिनेश कडू आणि सायली शहासने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

सूर निरागस हो….. या अभिषेक नलावडे यांनी गायलेल्या गीताने संगीत मैफलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आली माझया घरी ही दिवाळी….., एकाच या जन्मी….., विकत घेतला श्याम….., विठ्ठला तू वेडा कुंभार….., आम्ही ठाकर ठाकर….., राधा ही बावरी….., कुश लव रामायण गाती….., ऐन दुपारी….., जिवा शिवाची बैलजोड….., ऐरणीच्या देवा….., माळ्याच्या मळ्या मंदी ….., ए मेरी जोहराजबी….. आदी एकापेक्षा एक सरस गीते ऍड. अनिरुद्ध तथा मंदार भिडे, अभिषेक नलावडे, दीपाली देसाई, सई जोशी या गायकांनी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना सिंथेसायझर वर ओंकार देवस्कर, ऑक्टोपॅड वर प्रवीण भोपी, तबल्यावर विवेक भागवत, ताल वाद्यावर निलेश देवधर यांनी साथ संगत दिली. अनुया गरवारे – धारप यांनी खास शैलीत निवेदन सादर करून मैफलीची रंगत वाढविली.

महेंद्र थोरवे यांनी आपल्या मनोगतात, मकर्जत तालुक्यात भजन भूषण गजाननबुवा पाटील यांच्या मुळे तालुक्याला संगीत भजनाची ओळख निर्माण झाली. त्यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल. असा शब्द दिला. याप्रसंगी माजी उपसभापती मनोहर थोरवे, अभिनेत्री जुई गडकरी, मीना थोरवे, पुंडलिक पाटील, भाई गायकर, मोहन ओसवाल, रोहित विचारे, प्रसाद पाटील, सुचिता वांजळे, दिलीप गडकरी, मनीषा भासे, शेखर शहासने, स्नेहा गोगटे, पांडुरंग गरवारे, विकास चित्ते, कुमार गोखले, दिगंबर कांबळे, वैशाली मेढी, विद्या दगडे, विजय बेडेकर, विराज वैद्य, अभिजीत मराठे, भरत गावंड आदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version