| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत ही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात व शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचविण्यासाठी नेहमी अग्रेसर असते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा ग्रामपंचायतने सत्कार करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भेंडखळ गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय भेंडखळ येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास गावातील 300 वर ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांना ग्रामपंचायतीतर्फे रजई, पिलो कव्हर, बेड शिट, छत्री वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंजिता पाटील, स्वाती पाटील, दिपक ठाकूर, अजित ठाकूर, अभिजीत ठाकूर, लिलेश्वर भगत, सोनाली ठाकूर, शितल ठाकूर, स्वाती घरत, संगीता भगत, अक्षता अनिल ठाकूर, प्राची ठाकूर, ग्राम विकास अधिकारी किरण केणी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यालयीन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.