सरपंचपदी शेकापचे अमोल तांबोळी
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीवर शेकापचा लालबावटा फडकला आहे. महाविकास आघाडीच्यावतीने शेकापचे अमोल अनंत तांबोळी यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भागोराव वासांबेकर यांनी काम पाहिले.
केगाव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता असून, 13 पैकी 12 सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. शेकापचे अमोल तांबोळी तरुण कार्यकर्ते असून, शेकापने एका तरुण कार्यकर्त्याला पुढे नेले आहे. यावेळी त्यांनी केगाव ग्रामपंचायतीची विकासाची कामे करून ग्रामपंचायतीच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य हजर होते.
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, शेकापचे तालुका चिटणीस रवी घरत, मध्यवर्ती कमिटीचे सदस्य नरेश घरत, पंचायत समिती सदस्य महेश म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस नयन म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते जीवन पाटील, काँग्रेसचे सदानंद पाटील, शिवसेनेचे जयवंत पाटील, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य दत्ता घरत आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, केगाववासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.