राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट, शिंदे गट प्रत्येकी दोन, शेकाप एक
। कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील मांडवणे, कळंब, उक्रूळ, दहिवली तर्फे वरेडी, वावळोली, कोंदिवडे आणि वेणगाव या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी 18 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. आज मतमोजणी झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, बाळासाहेबांच्या शिवसेनेला दोन, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) दोन आणि शेतकरी कामगार पक्षाला एक असे थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले. तालुक्यात मतदारांनी कुणालाच नाराज न करता संमिश्र यश दिले. महाराष्ट्राचा विचार करता महा विकास आघाडी पाच तर शिंदे गटाने दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत वावळोली, वेणगाव आणि दहिवली तर्फे वरेडी या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वावळोली ग्रामपंचायत ही आमदार महेंद्र थोरवे, वेणगाव ग्रामपंचायत शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख भाई गायकर आणि दहिवली तर्फ वरेडी ग्रामपंचायत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसळ यांच्या गावाची ग्रामपंचायत आहे. हे सर्व बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच या ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असल्याने सर्वांचा निकालाची उत्सुकता होती. मात्र आमदार थोरवे व माजी सभापती अमर मिसाळ यांनी आपल्या ग्रामपंचायती जिंकल्या पण भाई गायकर यांच्या ग्रामपंचायतीत 9 पैकी सात जागा शिंदे गटाने जिंकल्या पण थेट सरपंच पदी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या आहेत.
थेट सरपंच निकाल
वावळोली ग्रामपंचायत : एकनाथ गणपत भगत ( बाळासाहेबांची शिवसेना ), वेणगाव ग्रामपंचायत :अश्विनी मंगेश पालकर ( राष्ट्रवादी काँग्रेस ), कोंदिवडे ग्रामपंचायत :प्रमोद विश्वनाथ देशमुख ( राष्ट्रवादी काँग्रेस ), दहिवली तर्फ वरेडी ग्रामपंचायत : मेघा अमर मिसाळ ( बाळासाहेबांची शिवसेना ), मांडवणे ग्रामपंचायत : रंजना बाळकृष्ण सावंत ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ), उकरूळ ग्रामपंचायत :नीलिमा योगेश थोरवे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ), कळंब ग्रामपंचायत :
प्रमोद तुकाराम कोंडीलकर ( शेतकरी कामगार पक्ष )
ग्रामपंचायत निहाय निवडून आलेले सदस्य…
1) वावळोली ग्रुप ग्रामपंचायत
प्रभाग 2
कांबे रुपाली सागर, कडू कांता छगन
2) कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायत
प्रभाग 1
गायकवाड समिर दत्तू, दिक्षीत आरती श्याम, ठोंबरे रखमी किसन
प्रभाग 2
गायकवाड किशोर द्वारकानाथ, ठोंबरे उषा अंकुश, देशमुख कल्पना जनार्दन
प्रभाग 3
सोनावणे नरेश सिध्दार्थ, पवार सुनिल राम, शेळके भाग्यश्री रामभाऊ
3) दहीवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत
प्रभाग 1
वाघमारे विष्णू शांताराम, भवारे यशवंत बळीराम,गायकवाड सोनम बंधू
प्रभाग 3
मोगरे महेंद्र पंढरीनाथ, तरे मानसी संजय
प्रभाग 4
विरले स्वाती सुनिल, विरले रोहिणी निलेश
4) मांडवणे ग्रामपंचायत..
प्रभाग 1
भोईर सचिन बाळकृष्ण, भोईर सोनल महेश, तुपे शैला निलेश
प्रभाग 2
प्रकाश पुंडलिक भालेराव, बोराडे शोभा रमेश
प्रभाग 3
घाडगे अविनाश नारायण, शेवाळे कोमल रमेश
5) वेणगाव ग्रामपंचायत..
प्रभाग 1
कडूसकर समीर काशिनाथ, मुंढे सुषमा कुमार,
प्रभाग 2
गायकर अभिषेक शांताराम, वाघमारे भिमाबाई नारायण,
रातांबे प्रिया प्रितम
प्रभाग 3
गायकवाड दिनेश दत्ता, पेठे समिर सुहास, सावंत जागृती अंकुश
प्रभाग 4
किसन चंदर मुकणे, कुडेकर संगिता कैलास
6 ) उकरुळ ग्रामपंचायत
प्रभाग 2
म्हसे पंकज रघुनाथ, मते गणेश मुकुंद, हजारे साधना जनार्दन
प्रभाग 3
गोसावी शिवाजी जानू, सावंत प्रमिला संदिप, थोरवे रुपाली धनंजय
7) कळंब ग्रुप ग्रामपंचायत…
प्रभाग 1
प्रसाद एकनाथ बंदे, रंजना निलेश वाघ
प्रभाग 2
बदे ओमप्रकाश शिवराम, निरगुडा निर्मला गणेश, बदे रेश्मा रमेश
प्रभाग 3
प्रकाश काळूराम निरगुडा, मोडक संतोष वसंत, ताईबाई पालू पारधी
प्रभाग 4
आंबो काशिनाथ पारधी, माळी सुगंधा शंकर, लोगडे कनिजा निसार
प्रभाग 5
मस्ते शाहिद सिकंदर, रेवता लहू ढोले
दहीवली ग्रामपंचायती मध्ये एका प्रभागात समान मते
दहीवलि तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये प्रभाग एक मधील अनुसूचित जमाती जागे वरील निवडणूक लढविणार उमेदवार विष्णू वाघमारे आणि दत्ता वाघमारे यांना समसमान 441मते मिळाली.शेवटी चिठ्ठी काढली असता विष्णू वाघमारे हे चिठ्ठीवर निवडून आले.