महाड तालुक्यात दरड कोसळली; ३० घरे ढिगाऱ्याखाली, ७२ लोक बेपत्ता

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
महाड तालुक्यावर संकटामागुन संकट कोसळतच असतानाच सायंकाळी महाड तालुका बिरवाडी पासून 14 की लो मी, वर तलीये या गावी मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळून ,/दरड कोसळून सुमारे 30 घरे गाढली गेली असून 72 लोक बेपत्ता असल्याची माहिती तलीयेचे सरपंच यांनी दिली आहे. एनडीआरएफ च्या मदतीच्या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहेत. या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाड, पोलादपूर परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली असून महाड शहर व सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील दादली पुलावरून पाणी वाहत आहे, शहरातील व नदीकिनारी सखल भागांमध्ये पाणी पातळी वाढलेली आहे.

Exit mobile version