अज्ञातांकडून मुख्य रस्त्यालगत लावण्यात आले बॅनर
ठरला सर्वस्तरीय चर्चेचा विषय
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यात सर्वत्रच खड्ड्यांच्या समस्येने उच्छाद मांडलेला असताना कुणा अज्ञाताकडून मालवण तालुक्यातील खड्डे असणार्या रस्त्यांच्या परिसरात विविध ठिकाणी बॅनर्सद्वारे संताप व्यक्त करत उपरोधिक टोले लगावले आहेत. सध्या हे बॅनर्स सर्वस्तरीय चर्चेचा विषय बनला आहे.
पर्यटकांची पसंती असणार्या मालवण तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत सातत्याने लक्ष वेधूनही हा प्रश्न गेली बरीच वर्षे न सुटल्याने लोकप्रतिनिधींच्या विरोधात स्थानिक आणि पर्यटक अशी दुहेरी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील कांदळगाव, यरी- भुतनाथ, तारकर्ली, देवबाग या मुख्य रस्त्यालगत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. यापैकी काही ठिकाणचे बॅनर काहींनी फाडून टाकले होते. या बॅनरवर सध्या वायात ङ्गसमर्थक कडवे असावे पण हजार वेळा खड्ड्यात पडले तरी आपल्या साहेबांना समर्थन देणारे नसावेफ, ङ्गएक फाडलात 10 लावणार पण मालवण-तारकर्ली रस्त्यावरील खड्ड्यांच वैभव दाखवतच राहणारफ, ङ्गतारकर्ली एक पर्यटन गाव?? की तारकर्ली एक खड्डेमय गाव??फ, ङ्ग बॅनर फाडा किंवा जाळा पण या खड्ड्यातून जाताना तोंड करा काळाफ यासारखे उपरोधिक टोले लगावण्यात आले आहेत.