मराठवाड्यामध्ये शेकापला गतवैभव प्राप्त करुन देणार

माजी आ. पंडित पाटील यांचे प्रतिपादन
बीड | प्रतिनिधी |
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाला गतवैभव मिळून देणार असल्याचे प्रतिपादन मराठवाडा संपर्क चिटणीस माजी आ. सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी केले.
नुकतीच भारतीय शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झाली. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी मराठवाडा विभागीय प्रभारी चिटणीस भाई विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाई सय्यद गफार, भाई सय्यद शाकेर, भाई विष्णूपंत घोलप, भाई अभी लोंढे, भाई आकाश निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते.
भाई बाळासाहेब घुमरे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. भाई राजेंद्र नवले यांनी सत्रसंचालन, तर भाई राजू शेख यांनी आभार मानले.
या बैठकीला इमरान शेख, अ‍ॅड. संग्राम तुपे, आबासाहेब सोळुंके, मोहन गुंड, वाल्मिक कदम, लहू सोळुंके, संजय येवले, नारायण गोले, दत्ता कांगडे, हरिभाऊ भोपळेंसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोव्हिड नियमांचे पालनदेखील करण्यात आले होते.

या विषयांवर चर्चा
बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वाढीसंदर्भात तसेच शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात, वाढते इंधन दर, महागाई, खाद्यपदार्थांचे गगनाला भिडलेले दर या प्रमुख विषयांवर मुद्देसूद चर्चा झाली. यासंदर्भात पुढील धोरणदेखील ठरविण्यात आले.

Exit mobile version