माजी आ. पंडित पाटील यांचे प्रतिपादन
औरंगाबाद | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष म्हणजे प्रामाणिकपणा, विचारनिष्ठा आणि बहुजन विचारांची चळवळ आहे, असे प्रतिपादन मराठवाडा संपर्कप्रमुख माजी आ. पंडित पाटील यांनी केले. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील शेकाप पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.
माजी आ. पंडित पाटील सध्या मराठवाड्याच्या दौर्यावर आहे. यादरम्यान ते अनेक ठिकाणी शेकाप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असून, यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे. यावेळी पंडित पाटील यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. उमाकांत राठोड, भाई चंद्रकांत चव्हाण, भाई युनुस पठाण, सिल्लोड भाई चंद्रशेखर सरोदे पैठण, भाई विकास काका शिंदे, भाई किशोर नाडे, अन्सार भाई शेख, भाई दत्ता तांगडे, भाई संतोष दळवे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.