| मुंबई | प्रतिनिधी |
हायड्रोपॉनिक गांजा तस्करीच्या आरोपाखाली मिस केरळ म्हणून ओळखलर जाणारी हर्षा सनी हिला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली आहे. तिच्याकडून 11.824 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 11.82 कोटी इतकी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (एपीआयएस) बसवण्यात आली आहे. त्या यंत्रणेद्वारे प्रोफाईलिंगच्या आधारे एआययूच्या पथकाने हर्षाला ताब्यात घेतले. तिला चौकशीसाठी थांबवण्यात आले. तिच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता त्यात 12 हिरवट रंगाचा पदार्थ असलेली पाकिटे सापडली. ती पाकिटे एनडीपीएस किटच्या सहाय्याने तपासणी केली असता तो गांजा असल्याचे उघड झाले.





