अंकुश आपटे यांचा उपक्रम
| पाली | प्रतिनिधी |
आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र पुणेचे अध्यक्ष अंकुश आपटे यांच्या वतीने महायज्ञ दुधाचा या विशेष सामाजिक उपक्रमाचे अंतर्गत व्यसनमुक्तीचा नारा समाजामध्ये आणखी प्रबळ करण्यासाठी दारू सोडा, दूध प्या या संकल्पनेतून तब्बल 350 लिटर दुधाचे मोफत वाटप बुधवार (दि.31) डिसेंबरच्या पूर्वसंध्येला करत पाली रहिवाशांसाठी एक संस्मरणीय दिवस ठरला.
नववर्षासाठी एक अत्यंत सुंदर आणि सामाजिक संदेश देणारा कार्यक्रम संपन्न झाला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या सुवचनांप्रमाणे अनेकांना आयुष्यामध्ये व्यसनमुक्तीचा परिस स्पर्श देणाऱ्या अंकुश आपटे यांच्या सामाजिक उपक्रमाला पालीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी शेकडो तरुण, महिला, व लहान मुलांसोबतच अनेक ज्येष्ठांनी आपला सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाली नगरपंचायतीचे सन्माननीय नगराध्यक्ष पराग दादा मेहता, आलाप मेहता, आरिफ मणियार, सुलतान बेंणसेकर, सुशील जी शिंदे, धनंजय गद्रे, ज्ञानेश्वर फोंडे, रंनजीत खोडागळे, यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपली उपस्थिती लावली. पाली पोलीस स्टेशन तथा वाहतूक शाखा आणि पाली नगरपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले.
