राष्ट्रवादी अंकुश आपटे यांची सामाजिक बांधिलकी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
दरडग्रस्त इर्शाळवाडी गावातील आदिवासी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या आपत्तीमधून बचावलेल्या नागरिकांचा सारा संसार मातीमोल झाला आहे. या आदिवासी बंधूभगिनींना आपले कुटुंबीय, मित्रपरिवार व प्रशासनाशी संपर्क साधता यावा या उद्देशाने सोमवारी (ता.31) राष्ट्रवादी काँग्रेस पाली शहर उपाध्यक्ष अंकुश आपटे यांच्यातर्फे तब्बल 42 जणांना मोबाईल फोन देण्यात आले. या सर्व लोकांना आता मोबाईलच्या माध्यमातून सर्वांसोबत संवाद साधणे शक्य झाले आहे. शिवाय प्रशासनसुद्धा या आपत्तीग्रस्त लोकांसोबत संवाद साधून आवश्यक माहिती व मदत पुरवू शकते. या कुटुंबियांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम अंकुश आपटे यांनी केले. यावेळी आ. महेश बालदी, प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ कुर्लेकर हे या सामाजिक कार्यक्रमास उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.