मेळाव्याचे प्रास्ताविक करताना माजी आम.बाळाराम पाटील यांनी जसा विठ्ठलाच्या वारकऱ्याला आषाढी यात्रेची ओढ असते त्याचप्रमाणे रायगडातील शेकाप कार्यकर्त्याला 2 ऑगस्टला होणाऱ्या शेकाप मेळाव्याची ओढ असते.मेळावा कुठेही असो त्यासाठी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सहभागी होत असतात असे सांगितले.विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राजकीय अराजकता माजली आहे.कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही.अशा परिस्थितीत शेकापने आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले आहे.पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जी शिकवण घालून दिली तिची पाठराखण करण्याचे काम आम्ही करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
आ.जयंत पाटील यांचे दर्जेदार काम
विधिमंडळातील कामकाजात सर्वात दर्जेदार काम कुणाचे असेल तर ते शेकाप आम.जयंत पाटील यांचेच असल्याचे दिसत आहे,हे अभिमानाने नमूद करावे लागेल.सत्ता असो वा नसो पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शेकाप नेहमीच अग्रेसर राहिला आहे.यापुढेही होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आ.जयंत पाटील यांना अपेक्षित असे यश मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू या,असे आवाहनही बाळाराम पाटील यांनी केले.राज्यातील प्रस्थापितांच्या विरोधात प्रागतिक पक्षांची मोट बांधण्याचे काम आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत.त्यासाठी त्यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहू या.असे आवाहनही त्यांनी केले.
नैना विरोधात पायी दिंडी
पनवेल,उरण,कर्जत परिसरात होऊ घातलेल्या नैना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गुरुवारी ( 3 ऑगस्ट) पनवेल ते आझाद मैदान अशी पायी दिंडी काढून सरकारला जाब विचारला जाणार असल्याचेही बाळाराम पाटील यांनी जाहीर केले.