39 हजार 750 रुपये चोरणाऱ्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पेण । प्रतिनिधी ।
पेण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी सांयकाळी 4:30 च्या सुमारास पेण शहरातील एस टी स्टॅन्ड येथे रोहा तालुक्यातील खारी येथील फिर्यादी एकूण 39 हजार 750/- रुपये रक्कम आपल्या पॅन्टच्या डाव्या खिशामध्ये ठेवुन पेण एस टी स्टॅन्ड येथे गर्दीतुन ते रोहा जाण्याकरीता पेण एस टी स्टॅन्ड येथे गर्दीतुन पनवेल रोहा शिवशाही बसमध्ये चढत होते. त्याचवेळी कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील रक्कम चोरली.
याबाबत पेण पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करीत आहेत.