रायगड़ जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली

सकाळी गारवा मात्र दुपारी उष्म्याने हैराण
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

मार्च महिना उजाडला आणि जिल्ह्यात उन्हाची काहीली वाढली आहे. हवामान अहवाल ऍपवर या आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस तर किमान 21 ते 35 अंश सेल्सिअस इतके नोंदले आहे. सध्या जिल्ह्यात सकाळी गारवा तर दुपारी उकाडा जाणवू लागला आहे.त्यामुळे गारवा मिळवण्यासाठी नागरिक वेगवेगळे पदार्थ विकत घेत आहेत. महाड, खालापूर, तळा, पोलादपूर, पेण, कर्जत, अलिबाग व सुधागड या तालुक्यात किमान तापमान देखील 24 अंश सेल्सिअस व त्यापुढे नोंदविले गेले आहे. तापमान वाढीमुळे उकाडा सहन होत नसल्याने शरीराला गारवा आणण्यासाठी अनेक जण थंड पेये, गोळा, कलिंगड, काकडी खाणे पसंत करत आहेत. तर काहीजण फळांचा रस पित आहेत. काही दिवसांनी उन्हाची काहिली वाढणार असल्याने उष्माघाताचा धोका देखील वाढण्याची शक्यता आहे.

सध्या उष्णता वाढत असल्याने अनेकजण शरीराला थंडावा देण्यासाठी कलिंगड खात आहेत. यंदा जिल्ह्यात कलिंगडाचे उत्पादन चांगले आले आहे. विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी 10 ते 20 टक्क्यांनी किंमती वाढल्या आहेत.

कलिंगड विक्रेते, पाली
Exit mobile version