रोहितच्या हातात ट्रॉफी नव्हे रिप्लिका

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन विश्‍वविजेता संघ मुंबईकडे जल्लोषासाठी रवाना झाला आहे. रोहित शर्मा आणि द्रविडने मोदींच्या हातात ट्रॉफी ठेवली. रोहित वेस्ट इंडिजहून घेऊन आलेली ट्रॉफी ही प्लॅटीनमची नाही तर चांदीची आहे. वर्ल्डकपची ट्रॉफीतर सोन्याची असते. मग भारतीय संघाला सिल्व्हर रंगाची ट्रॉफी का दिली गेली? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात असेल. अनेकांना वाटले असेल ती व्हाईट गोल्डची आहे. परंतु नाही ती ट्रॉफी व्हाईट गोल्डची नाही. ती चांदीचीच आहे. मग सोन्याची आणि चांदीची ट्रॉफी कधी दिली जाते? मुख्य वर्ल्डकप असेल तेव्हा सोन्या, चांदीची ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाते.

Exit mobile version