सीबीआय जबाबात परमबीर सिंहांचा थेट गृहमंत्र्यांवर आरोप

। मुंबई । वृत्तसंस्था ।
सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच माझ्यावर दबाव टाकला होता असा धक्कादायक खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. १०० कोटी वसूली प्रकरणात परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबा दरम्यान अनेक राजकीय नेत्यांवर आरोप करत धक्कादायक खुलासे केले.

सीबीआयला दिलेल्या जबाबत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर काहींना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकृत्यांबद्दल माहिती दिली होती. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना देशमुख यांच्या गैरव्यवहारांबद्दल माहिती देण्याआधीच त्यांना याबाबत या प्रकरणांची जाणीव होती. असा दावाही परमबीर यांनी केला. तसंच सचिन वाजेला पून्हा सेवेत घेण्याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव आणला होता असही सिंग सीबीआय जबाबात म्हणाले आहेत.

देशमुख हे अनेक गुन्ह्याबाबत अधिकारऱ्यांना स्वत: आदेश देत असत, तसेच माझा पश्चात देशमुख अधिकार्यांना बोलावून आदेश द्यायचे या आदेशाबाबत किंवा अधिकार्यांच्या भेटीबाबत मला काहीच सांगितले जायचे नाही. माझा परवानगी शिवाय अनेक गुन्ह्यात ते अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यात प्रामुख्याने टीआरपी केस, फेक फाॅलोअर्स केस, संजय छाब्रीया केसचा समावेश असल्याचं परमबिर सिंग यांनी सीबीआयला सांगितलं आहे.

Exit mobile version