गावदेवी क्रिकेट क्लब सुकेळी आयोजित स्पर्धा

जय वाघेश्‍वर तामसोली संघ विजेता
। सुकेळी । वार्ताहर ।

ऐनघर विभागीय क्रिकेट असोसिएशनतर्फे गावदेवी क्रिकेट क्लब सुकेळी यांच्या वतीने स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. सामन्यांचे उद्घाटन रविवार( दि.13) रोजी सुकेळी येथिल राम तेलंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो जय वाघेश्‍वर तामसोली संघ. या संघास रोख रक्कम 7,000/- रु.व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय क्रमांक गावदेवी सुकेळी व तृतीय क्रमांक जय हनुमान वेताळवाडी या संघास देण्यात आले. या सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाज जय हनुमान वेताळवाडी संघाचा महेश वाळगुडे, उत्कृष्ट गोलंदाज गावदेवी सुकेळी संघाचा ओमकार समन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रजत तेलंगे, सामनावीर सौरभ कणघरे, पब्लिक हिरो विशाल सुटे, तर सिक्सर किंग सौरभ कणघरे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या बक्षिस वितरण मनोहर सुटे, सुधिर ढाणे, संतोष खाडे, जितेंद्र धामणसे, विनायक झोलगे, प्रसाद उंबरे, कमळाकर सुटे, तसेच सुकेळी ग्रामस्थ व परिसरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश तेलंगे यांनी केले. हि क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावदेवी क्रिकेट क्लब सुकेळीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version