जिल्ह्यात चिऊताईंसह अनेकांचे पारडे जड; कार्यकर्त्यांचा विश्‍वास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या प्रचारात चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्यासह बाळाराम पाटील, प्रीतम म्हात्रे, अतुल म्हात्रे यांच्यासह स्नेहल जगताप यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उद्या बुधवारी (दि. 26) होणार्‍या मतदानाच्या दिवशी मतदार त्यांनाच मताधिक्य देतील, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे चिऊताईंसह अनेकांचे पारडे जड असणार असल्याचे ही ते म्हणाले.

अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई, पनवेलचे उमेदवार बाळाराम पाटील, उरणचे उमेदवार प्रीतम म्हात्रे, पेणचे उमेदवार अतुल म्हात्रे तसेच महाड मतदारसंघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रॅली, बैठका, सभा घेण्यात आल्या. या प्रचार रॅलीसह सभांना कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उच्च शिक्षित व विकासाचा ध्यास घेतलेल्या या उमेदवारांना मतदारांकडूनही प्रचाराच्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मतदार स्वयंस्फूर्तीने या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे वाढत्या प्रतिसादामुळे या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.
अलिबाग, पनवेल, उरण, पेण, महाड, कर्जत, श्रीवर्धन या सात विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान वीस नोव्हेंबरला आहे. अलिबागच्या चित्रलेखा पाटील यांच्यासह महाडमधील स्नेहल जगताप, पनवेलमधील बाळाराम पाटील, उरणमधील प्रितम म्हात्रे आणि उरणमधील अतुल म्हात्रे या उमेदवारांनाच मतदार निवडून देतील, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील पाणी, आरोग्य, महागाई, महिला अत्याचार अशा अनेक प्रश्‍न घेऊन विरोधकांना मतदार घरी बसविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Exit mobile version