| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
खेळाची आवड असेल तर वय किंवा कोणताही आजार तुम्हाला खेळण्यापासून लांब करू शकत नाही. वयाच्या 80, 90 किंवा 100 व्या वर्षीही माणूस मैदानात कोणताही खेळ खेळू शकतो. असेच काहीसे 83 वर्षीय स्कॉटिश माजी डोमेस्टिक क्रिकेटर ॲलेक्स स्टीलने दाखवून दिले आहे. ॲलेक्स स्टील पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर बांधून क्रिकेट खेळताना दिसला.
खरेतर माजी स्कॉटिश क्रिकेटर ॲलेक्स स्टील नुकताच स्थानिक क्लब सामना खेळला. यावेळी तो पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. तसेच, सर्वजण त्याच्या क्रिकेटच्या आवडीला सलाम करत आहेत. ॲलेक्स 2020 मध्येच इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराशी झुंज देत आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की, ॲलेक्स आता जास्तीत जास्त एक वर्ष जगू शकेल. ॲलेक्स या आजाराशी झुंज देत असल्याने शरीरात अचानक ऑक्सिजनची कमतरता जाणवते. श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारात बहुतांश लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळेच ॲलेक्स ऑक्सिजन सिलिंडर घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरला.
पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर बांधून मैदानात
