भात पेरणी अंतिम टप्प्यात

। गोवे कोलाड । वार्ताहर ।
संपुर्ण रायगड जिल्ह्यात जुन महिना संपता संपता पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. खरिपाच्या लांबलेल्या पेरणीला जोरदार बळीराजाने सुरवात केली असून तो शेतीकामात आता व्यस्त झाला असल्याचे दिसून येत आहे.त् यामुळे बळिराजामध्ये देखिल आंनदाचे वातावरण पसरले आहे. या समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना देखिल चांगल्या पद्धतीत सुरुवात झाली असून सर्जा राजाची जोडी बळीराजा आता नांगरणीसाठी सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस अधिक लांबला त्यामुळे बळीराजाची खरीप हंगामातील भात पेरणी देखील लांबली परंतु ऊशिरा का होईना पावसाने सोमवारी सकाळपासूनच दमदार हजेरी लावत सुरुवात करून सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झाले.यामुळे शेतक्यांची भात पेरणीची काम आता अंतिम टप्प्यात आली आहेत.

Exit mobile version