| कर्जत | प्रतिनिधी |
समाजात वृद्धाश्रम वाढत चालले आहेत अगदी पंचतारांकित होत चालले आहेत. त्यामध्ये सर्व मिळते पण स्नेह, प्रेम व जिव्हाळा कुठे आहे? असे महत्वपूर्ण प्रतिपादन माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी येथे केले. कर्जत रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळ्याचे राज कॉटेजच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऋतुजा भोसले, सतीश श्रीखंडे, डॉ. प्रेमचंद जैन, सुर्याजी ठाणगे, जितेंद्र ओसवाल, विशाल शहा, सचिन ओसवाल आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षपदी जितेंद्र ओसवाल, सचिवपदी सचिन ओसवाल तर खजिनदार पदाची जबाबदारी हुसैन जमली यांच्याकडे सोपविण्यात आली. स्वागत सतीश श्रीखंडे यांनी केले. अहवाल वाचन सचिन ओसवाल यांनी केले. श्रीखंडे यांचे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या सह उपस्थितांनी त्यांचे खास अभिनंदन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र ओसवाल, ऋतुजा भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हुसेन जमाली आणि अभिषेक सुर्वे यांनी सूत्रसंचालन तर अरविंद जैन यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, दिपक बेहरे, किरण ठाकरे, दिनेश जैन, ॲड. चंपालाल ओसवाल, राजेंद्र ओसवाल, विनीता घुमरे, मुकेश सुर्वे, रणजीत जैन, सूर्याजी ठाणगे, रामदास घरत, दिपचंद जैन, हिम्मतमल ओसवाल, मुकेश सुर्वे, साईनाथ श्रीखंडे, संजय वाघमारे आदी उपस्थित होते.