| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील सोमटणे येथे टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत निशा जनार्दन पाटील (वय 54) यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी पनवेल तालुक्या पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमटणे येथील निशा जनार्दन पाटील (वय 54), जनार्दन पाटील, निखिल म्हात्रे व रिक्षाचालक हे रिक्षा क्रमांक एमएच 46 एझेड 2520 ने सोमटणे येथे परत येत होते. यावेळी आपटे फाट्याजवळ आले असता त्यांच्या रिक्षाला टेम्पो क्रमांक एमएच 46 बीएफ 6930 वरील चालकाने जोरदार धडक दिली. टेम्पोचालक अतिवेगात असल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरील रिक्षाला त्याने जोराची धडक दिली.
या अपघातात जनार्दन पाटील, निखिल म्हात्रे व रिक्षाचालक हे जखमी झाले. तर निशा पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात टेंपो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.