याही वर्षी बाप्पांचे आगमन खड्ड्यांतूनच

शहरातील रस्त्यांची दयनिय अवस्था
। मुरुड जंजिरा । प्रतिनिधी ।
मुरूड शहरातील जुनीपेठ रस्त्यांची दुर्दशा हा कायमच चर्चेचा विषय. पावसाळा आला की, रस्ते खड्ड्यात जातात आणि या चर्चेला उधाण येते. मग सुरू होतो आरोप-प्रत्यारोपांचा खेळ, तो ही सालाबादप्रमाणे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना मामुली मलमपट्टी करुन जनक्षोभ कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अवघ्या दीड महिन्यांवर येवून ठेपलेल्या मबाप्पांचे आगमन याही वर्षी खड्ड्यातूनच होणार का?. खाद्यामुळे अनेकांना मानेची व पाठीच्या काण्याची आजार जडले खडे चुकीच्या पद्धतीने बुजवल्याने खड्डे अजून मोठे झाले

शहरातील रस्तांचा प्रश्‍न दरवर्षी ऐरणीवर येतो प्रत्यक्षात रस्त्यांची चांगल्या दर्जाची कामे केली जातात का? जर कामाचा दर्जा चांगला असेल तर रस्ताची दुर्दशा होण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही. शहरातील काही ठिकाणी रस्तावरील मोठ मोठे खड्डे उखडायल्याने या रस्त्याची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे.रस्ताची कामे चांगल्या दर्जाची होतील का? हा प्रश्‍न खड्यांनाही पडत आहे.दरवर्षी रस्तावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. परंतु कामेच निकृष्ठ दर्जाची होत असल्याने रस्तांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत जाते .नगरपरिषदेच्या मार्फत शहरातील खड्डे बुजवण्याचं काम मे च्या शेवटच्या तारखेला सुरवात होते.यासारखं दुर्भाग्य काय. खड्डे बुजवण्याला सुरवात होताच पावसानी हजेरी लावली त्याच पावसात खड्डे भरले जातात आणि ते पुन्हा उखडले जातात. याला काय म्हणाचं? जुनीपेठच्या नशीबी रस्त्यावर खड्डेच लिहले आहेत.

मुरूडकरांचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव अवघ्या दिड महिन्यांवर येवुन ठेपल्याने ठाणे, मुंबईहून गावाला येण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने येतात या काळात रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.त्यामुळे रस्त्यावरील खड्डे अधिकच उखडु शकतात. त्यामुळे गणेशभक्तांना याहीवर्षी खड्डयातुनच प्रवास करावा लागणार आहे.मुळातचं रस्तांची अभ्यासपूर्ण बांधणी केली जात नाही.किंवा डागडुजी करताना शास्त्रशुद्ध पध्दत अवलंबली जात नाही तो पर्यंत खड्यांचा सामना करावाच लागणार.

Exit mobile version