जोहेत नवीन अंगणवाडी, पाण्यासाठी पाईपलाईनचा शुभारंभ
धैर्यशील पाटील, निलिमा पाटील यांची उपस्थिती
। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकारातून हमरापूर विभागातील जोहे ग्रामपंचायतीमध्ये नवीन अंगणवाडी व पाण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ माजी आ. धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती अॅड. निलीमा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जोहे गावासाठी 8.5 लाख रुपये खर्च करून अंगणवाडीची नवीन इमारत तसेच जोहे गावातील क्रांतीनगर येथे नव्याने टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी धैर्यशील पाटील यांनी सांगितले, की आजही आपण विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू देत नाहीत. लोकांच्या समस्या निवारण्याचे काम योग्य विकास निधी वापरुन आपण करत आहोत. त्यामुळे विकासकामे आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा अतूट नाते आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी आ. धैर्यशील पाटील, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती अॅड. निलीमा पाटील, संजय डंगर तालुका चिटणीस शेकाप पेण, परशुराम पाटील माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तैलेश पाटील माजी उपसभापती पेण, स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जोहे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामे आणि शेतकरी कामगार पक्ष यांचे अतूट नाते आहे. लोकांच्या समस्या निवारण्याचे काम योग्य विकास निधी वापरुन शेकापच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गावांचा विकास हाच आमचा ध्यास असून, त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. – धैर्यशील पाटील, माजी आमदार