दोन दिवसात उखडला कोटींचा रस्ता

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुडच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा साळाव-आगरदांडा रस्ता नवीन बनवण्यासाठी शासनाने 27 कोटी मंजूर करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, अवघ्या दोन दिवसातच हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे रस्ता बांधकाम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रमेश गोरे यांना विचाराणा केली असता ते म्हणाले की, आगरदांडा रस्त्याला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी वाहनचालक बिनधास्तपणे ओल्या डांबरावरुन गाड्या चालवण्याने रस्त्यावरची डांबर निघाली आहे. ज्या ठिकाणी डांबर निघाली आहे, त्याठिकाणी पुन्हा डांबर टाकून रस्ता बनविला जाईल. पुढील रस्त्याचे काम रात्रीच्या वेळी सुरू करण्यात येईल. नागरिकांनी व वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही रमेश गोरे यांनी केले आहे.

Exit mobile version