लक्ष्मी पाटील पुण्यतिथी साजरी
। उरण । वार्ताहर ।
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालन विभाग फुंडे येथे सांस्कृतिक विभागांच्या वतीने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची 92 वी पुण्यतिथी साजरी झाली. या कार्यक्रमासडॉ.विद्या नावडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य,डॉ.पी.जी. पवार हे उपस्थित होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मी वहिनी यांच्या कार्याचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ.सुजाता पाटील यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत गोतपागर यांनी केले,तर आभार प्रा.सी.डी.धिंदळे यांनी मानले.कार्यक्रमास डॉ.साहेबराव ओहोळ,डॉ.विलास महाले, प्रा.उत्तमराव घोरपडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.







