| माथेरान । वार्ताहर ।
माथेरान या दुर्गम भागात अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत आणि त्यातच विशेषकरून याठिकाणी उच्चशिक्षित महिला वर्ग सुध्दा मोठया प्रमाणावर आहे. व्यवसायाचे मुख्य स्त्रोत नसल्याने उच्च शिक्षण घेऊन देखील त्या आजच्या काळात एका सर्वसामान्य गृहिणीचे जीवन कंठीत आहेत. त्यामुळे एकप्रकारे त्यांची खर्या अर्थाने मुस्कटदाबी होत असते. निदान हाताला रोजगार निर्माण व्हावा जेणेकरून या वाढत्या महागाईच्या काळात आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतो याच विवंचनेत इथला महिला वर्ग त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती येणार्या दिवसांचा सामना करत असतात. याकामी येथील काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा सुनील शिंदे यांनी याचे अवलोकन करून कुठल्याही परिस्थितीत आमच्या स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात त्यासाठी त्यांनी सुरुवातीला साबण व अगरबत्ती कशाप्रकारे बनविल्या जाऊ शकतात आणि त्याचे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्यावर महिलांच्या हाताला रोजगार प्राप्त होऊ शकतो यासाठी एक दिवसीय शिबिराचे दि.31 मार्च रोजी श्रीराम मंदिराच्या पटांगणात आयोजन केले होते. त्यावेळी शंभर पेक्षाही अधिक महिला व विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.