। माणगाव । वार्ताहर ।
समाजात विविध प्रकारचे वाद विवाद होत असतात. विशेष:ता ग्रामीण भागातील पक्षकार न्यायासाठी अपेक्षा करतात.ग्रामीण भागातील हे वाद विवाद त्या त्या ठिकाणी विद्यार्थांनी समजून घेऊन सोडविल्यास विद्यार्थाना समाजात काम करण्याची उर्जा मिळेल व पक्षकारांनाही मोफत न्याय मिळेल. असे अवाहन जिल्हा न्यायाधीश अलिबाग – रायगड विभा इंगळे यांनी माणगाव येथे अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयात मोफत सहाय्य व सल्ला केंद्राच्या उद्घाटनात व्यक्त केले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे यांचे हस्ते उद्घाटन 1 एप्रिल रोजी अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयात मोफत सहाय्य व सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी विधी सेवा समिती माणगावचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एन. एस. कोले, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. राजीव साबळे, विधी महाविद्यालयाचे चेअरमन अँड. विनोद घायाळ, माणगाव वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. महेंद्र मानकर, सचिव कृष्णा गांधी, नितीन बामुगडे, राजन मेथा, बबन गायकवाड, द.ग.तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन खामकर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.