। यवतमाळ । प्रतिनिधी ।
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, बाभूळगाव, कळंब, मारेगाव, महागाव, आणि झरी या सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीत 84 जागांसाठी 435 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यासाठी 47 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. राळेगाव नगरपंचायतीत 14 जागांसाठी 82 उमेदवार रिंगणात आहेत. कळंब नगरपंचायतीमध्ये 13 जागांसाठी 63 उमेदवार.
महागाव नगरपंचायतीमध्ये 13 जागासाठी 91, मारेगाव नगरपंचायतीमध्ये जागांसाठी 14 जागांसाठी 90, झरीजामणी नगरपंचायतीमध्ये 17 जागांसाठी 87 तर बाभूळगाव ग्रामपंचायतीमध्ये 13 जागांसाठी 62 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. याबरोबरच ढाणकी नगरपंचायतीत दोन जागांसाठी मतदान होत आहे.
बाभूळगावात 5 हजार 70 मतदार असून पुरुष मतदार 2 हजार 544, तर महिला मतदारांची संख्या 2 हजार 526 इतकी आहे.
कळंब नगरपंचायतीत 14 हजार 206 मतदार आहेत. त्यात पुरुष 7 हजार 88, महिला 7 हजार 118, राळेगावात 12 हजार 527 मतदार आहेत. झरीजामणी येथे 2 हजार 268, महागावमध्ये 7 हजार 520, तर मारेगाव नगरपंचायतीमध्ये 6 हजार 507 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहे.