अलिबागच्या सौंदर्यात नवी भर! श्रीबाग-म्हाडा आयलँडचे प्रशांत नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

|अलिबाग | प्रतिनिधी |

शहराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांना आकर्षक आणि सुशोभित परिसर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने श्रीबाग-म्हाडा आयलँडच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचा उद्घाटन समारंभ माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

अलिबाग शहराच्या विकासात केवळ मोठ्या पायाभूत प्रकल्पांनाच नव्हे, तर शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि नागरिकांना अनुभवता येणाऱ्या सार्वजनिक सुविधांनाही महत्त्व आहे. याच दृष्टिकोनातून श्रीबाग-म्हाडा आयलँडच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आकर्षक सजावटीमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून, शहराच्या दर्शनी भागाला नवे रूप प्राप्त झाले आहे.

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असून, शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठीही अशा सुशोभित आणि देखण्या परिसरातून शहराची सकारात्मक ओळख निर्माण होण्यास मदत होते. शहराच्या विकासासोबतच परिसराचे सौंदर्य जपणे आणि नागरिकांना अधिक चांगला परिसर उपलब्ध करून देणे हीदेखील विकासाची महत्त्वाची बाजू असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

यावेळी नगरसेवक प्रदीप नाईक, सभापती अनिल चोपडा, संदीप पालकर, श्वेता पालकर, महेश शिंदे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. श्रीबाग-म्हाडा आयलँडच्या सुशोभीकरणामुळे परिसराच्या सौंदर्यात झालेली भर नागरिकांसाठी आनंददायी ठरणार आहे.

Exit mobile version