। नागोठणे । वार्ताहर ।
रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोशिएशनच्या उभारणीत अनेक जुन्या व नावाजलेल्या डॉक्टर्सनी योगदान दिले आहे. कोरोना काळातही तालुक्यातील सर्वच डॉक्टर्सनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. यातच सुतारवाडी येथील डॉ. गुलाबराव पाटील व पालीचे डॉ. मुजुमदार हे दोन हरहुन्नरी डॉक्टर्स कोरोनाचे बळी ठरले याचे दु:ख आहे. मेडिकल असोसिएशनने अध्यक्ष डॉ. धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरासाठी चांगल्या उपक्रमांचे आयोजन केले असल्याने व त्यांनी पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंच्या हस्ते पदभार स्वीकारला
यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तंत्रज्ञान बदलत आहे. हे तंत्रज्ञान सर्वच डॉक्टर्सनि आत्मसात केले तर रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल. डोळे हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग असल्याने त्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. आज आपल्या देशात लाखोंच्या संख्येने अंध व्यक्ती असूनही नेत्रदान करणार्यांची संख्या कमी असल्याने नेत्रदानाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. 1995 ला मला माझ्या आईने किडनी दिली नसती तर मी माझे कार्य करू शकलो नसतो. त्यामुळे प्रत्येकाने मिळालेल्या दुसर्या जन्मात काहीतरी अमाजिक कार्य करावे. त्यासाठीच अवयव दानाची चळवळ खेडोपाडी सुरु करावी अशी अपेक्षा यावेळी डॉ. लहानेंनी व्यक्त केली.