| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
डाॅ. चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पोलिस अधीक्षक रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान ने बसवलेल्या दोन तोफांच्या तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, नगरसेवक कल्याण डोंबिवली महेश पाटील आणि नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर, ग्राम पंचायत सदस्या हर्षदा मयेकर यांची उपस्थिती लाभली, तसेच शेकडो सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.