| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या तर्फे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबागच्या खेळाडूंसाठी पी एन पी शैक्षणिक संकुलात निर्माण केलेल्या बहुउद्देशीय बास्केट बॉल आणि व्हॉलीबॉल कोर्टचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या सह वेश्र्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, पी एन पी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ओमकार पोटे, मुख्याध्यापक मगर, साई पाटील आदी उपस्थित होते. यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, भारतामध्ये जर आपण तरुणांसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर ग्रामीण युवा वर्गात खेळांसाठी भरपूर वाव असल्याचे समोर येईल. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात भारताची निश्चित प्रगती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.