| कोर्लई | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात प्रथमच मुरुड तालुक्यातील काशिद येथील जंजिरा विद्या मंडळ व ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित माध्यमिक विद्यालयात प्रस्तावित विज्ञान केंद्रामधील थ्रीडी शोचे उद्घाटन जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर व ज्ञान सागर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय शिंदे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ज्यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभारण्यात आले ते मकरंद कर्णिक, सरपंच नम्रता कासार-खेडेकर, उपसरपंच वर्षा दिवेकर, सुनील दिवेकर, नरेश धार्वे, नंदकुमार काते, रमेश कासार, चंद्रकांत कासार, निलेश दिवेकर, सूर्यकांत जंगम, जंजिरा विद्या प्रसारक मंडळाच्या सर एस.ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक सरोज राणे, काशिद माध्यमिक शाळा मुख्याध्यापक किशोर गंभे, शिक्षक वृंद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंबई येथे नेहरू विज्ञान केंद्र तसेच पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रामध्ये जसा थ्रीडी शो असतो, तसाच शो आता रायगड जिल्ह्यातील पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या काशिद येथील माध्यमिक शाळेत पर्यटनवाढीच्या दृष्टीकोनातून सुरू करण्यात आला असून, यातून शाळेला आर्थिक लाभाबरोबरच स्थानिक रोजगारवाढीस चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केली.