| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वावंजे तळोजा येथील गाळयात ठेवलेल्या एक लाख एकवीस हजार रुपयांच्या ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस मेक इंजीनियरिंग वर्क्स, गाळा नंबर ‘ई’ 8- 9, वावंजे येथील गाळ्यात ठेवलेला 1 लाख 21 हजार रुपयांचे लाल रंगाच्या लोखंडी रिंग गार्डरचे साडेनऊ फुटाचे वीस तुकडे चोरट्याने गाळ्याच्या लोखंडी गेटला लावलेले कुलूप तोडून चोरून नेल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.