| पेण | प्रतिनिधी |
शासकीय तांत्रिक विद्यालय पेण येथे अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन संतोष पाटील याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वाचनाचे महत्व सांगून सततच्या वाचनाने माणसाची बौध्दिक प्रगल्बता वाढते त्यामुळे कमीत कमी दिवसातून अर्धा ते एक तास वाचन करण्यास सांगितले. या अभ्यासिका वर्गासाठी लागणाऱ्या पुस्तकांची व्यवस्था स्वखर्चातून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर अभ्यासिका वर्गाची वेळ सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी मुख्याध्यापिका पाटील वी.रा., संदानशिव पी.पी., जोशी एच.एस., डोणे पी.एम., व्हि.डी. साळवी, एन.डी.लोंढे, एस.व्हि.बेंडकुळे, एस.पी. झेमसे, एम.व्हि. पाटील, के.एस. भगत, एस.एस.गावंड अदी शिक्षकवृंद उपस्थित होते.