तुकाराम पाटील यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण
| कोर्लई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या मुरुडमधील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील यांच्या हस्ते शिवसेना (उ.बा.ठा.) उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे वामन चुनेकर, काँग्रेस पक्षाच्या वासंती उमरोटकर, हाफिज कबले, विजय गिद्दी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवसेना (उ.बा.ठा)चे सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख नौशाद दळवी, प्रमोद भायदे, शहर प्रमुख आदेश दांडेकर, अस्लम हलडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष नौशाद शाबान, मंजुम आपा, शकिब शाबानदार, भारत आग्रवकर, वीरेंद्र जावसेन, प्रशांत कासेकर, मुग्धा जोशी, सुदेश घुमकर व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.