माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्थानिकांना एका छताखाली खाद्य पदार्थांसह वस्तू खरेदी करता यावे, यासाठी अलिबाग समुद्रकिनारी लायन्स फेस्टीवलचे आयोजन दि.25 ते 29 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. लायन्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या या फेस्टीवलचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात झाला.
त्यांच्या समवेत माजी नगरसेवक प्रदिप नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, रिजन चेअरमन प्रियदर्शनी पाटील, आरसीएफचे कार्यकारी संचालक अनिरुध्द खाडीलकर, लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल अमरचंद शर्मा, उपप्रांतपाल एन.आर. परमेश्वरन, प्रांत उपप्रांतपाल संजीव सुर्यवंशी, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक वृषाली ठोसर, अनिल चोपडा, संजना कीर, महेश शिंदे, फेस्टीवल समितीचे अध्यक्ष अनिल म्हात्रे, लायन्स क्लबचे पदाधिकारी, सभासद संतोष पाटील, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी, नयन कवळे आदींसह लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी वेगवेगळ्या स्टॉलची पाहणी केली. फेस्टीवलच्या माध्यमातून ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू, खाद्य पदार्थ खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने मान्यवरांनी आयोजकांचे कौतूक केले. भव्य दिव्य अशा फेस्टीवलच्या शुभारंभाला अलिबागकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सायंकाळपासून ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे एक वेगळा उत्साह यावेळी निर्माण झाला. हँगर पद्धतीचे विस्तीर्ण दालन, सायमा पद्धतीचे अत्याधुनिक स्टॉल्स, जागतिक बाजारपेठेत नामांकित ब्रँड असलेल्या मीनल मोहाडीकर यांचे कंजूमर शॉपी या संस्थेच्या सहयोगातून सहयोग 170 हून अधिक स्टॉल्स महोत्सवामध्ये ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वस्तूंसह चटकदार व्हेज, नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
सांगता समारंभ ॲड. आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ 29 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाहक चित्रलेखा पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जेएस एम कॉलेजचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, अलिबागच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आदी अनेक मान्यवर महोत्सवाला दरम्यान भेट देणार आहेत.