| आपटा | प्रतिनिधी |
बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. पाताळगंगा यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचा उद्घाटन समारंभ गुरूवारी (दि.25) रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आला. बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड रवींद्र कुमार रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक शाळेत हा समारंभ पार पडला.
यावेळी आंचल दलाल यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना सांगितले की, बिर्ला कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबमुळे चौक व परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यातून निश्चितच विद्यार्थी शिकतील व त्यांना या क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळेल. या ए.आय. लॅबमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे चौक परिसरातील शैक्षणिक वातावरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जात आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाश देशमुख, चौक सरपंच रितू ठोंबरे, बिर्ला कार्बन कंपनीचे निखिल भांबरे, सुरेंद्र घोगरे, नरेंद्र शहा, योगेंद्र शहा, लक्ष्मण मोरे, पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, पूर्णेद्रोकुमार, यांच्यासह इतर मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचे उद्घाटन
